Babanrao gholap biography of william

Babanrao Gholap : काल शिंदे गटाला जय महाराष्ट्र, आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुलाला तिकीट मिळाल्यानंतर बबनराव घोलपांची घरवापसी

Babanrao Gholap Joined Shiv Sena UBT : योगेश घोलप यांना उमेदवारी मिळताच बबनराव घोलप यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत ठाकरे गटात घरवापसी केली आहे.

By : वेदांत नेब | Edited By: Aniruddha Joshi | Updated at : 27 Supplement 2024 02:52 PM (IST)

Babanrao Gholap Joined Shivsena UBT

Source : ABP Majha

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Group Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून देवळाली विधानसभा मतदारसंघ (Deolali Vidhan Sabha Constituency) चांगलाच चर्चेत आला होता. कारण महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar Group) यांच्यात या मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र अखेर ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली आणि माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांना तिकीट देण्यात आले. त्यांचा सामना राष्टवादी अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांच्याशी होणार आहे. योगेश घोलप यांना उमेदवारी मिळताच त्यांचे वडील बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिवसेना शिंदे गटाला (Shiv Sena Shinde Group) जय महाराष्ट्र केले. आज त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसी केली आहे.  

बबनराव घोलप यांनी लोकसभा निवडणुकीवेळी (Lok Sabha Elections 2024) शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र दोन दिवसापूर्वी देवळाली विधानसभा मतदारसंघात बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा एकदा बबनराव घोलप यांनी घरवापसी केली आहे. वडील बबनराव घोलप जरी शिंदे गटात गेले होते तरी योगेश घोलप मात्र शिवसेना ठाकरे गटासोबत होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

राजीनाम्यात काय म्हटलंय? 

बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, मी सहा एप्रिल रोजी आपल्या पक्षात प्रवेश केला होता. त्यात माझ्या समाजाच्या काही मागण्या मागितल्या होत्या व मतदारसंघात काही कामे करण्याचे मान्य केले होते. पण यापैकी एकही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे समाज फार नाराज झाला आहे. आता माझ्या मुलाला शिवसेनेने तिकीट देऊन माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेत. म्हणून मी आपल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा राजीनामा देत आहे, असे बबनराव घोलप यांनी म्हटले आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर देवळालीच्या जागेचा तिढा सुटला! ठाकरेंच्या शिवसेनेकडून योगेश घोलपांना तिकीट, सरोज अहिरेंना देणार तगडं आव्हान

हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, भाजप आमदाराला दिल्लीतून फोन; नाशिक पोलिसांनी घेतला शोध

अधिक पाहा..

सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी

तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप

धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई

मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!